लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी साडेतीनलाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील एन.आर.आर. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी अटक केली. एसीबीच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

एसीबीने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, इमारत पडल्याप्रकरणी तक्रारदारांच्या वडिलांविरूध्द नवी मुंबईतील एन. आर. आय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या तक्रारदारांचे वडील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांनी तक्रारदारांकडे प्रथम १२ लाख रुपये व त्यानंतर २ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी ती रक्कम तक्रारदारांकडून यापूर्वीच स्वीकारली होती.

आणखी वाचा-हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी गिरवले मूकबधीरांच्या सांकेतिक भाषेचे धडे

त्यानंतर पुन्हा २ ऑक्टोबर रोजी तक्रारदारांच्या वडिलांविरोधात एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे, नवी मुबंई येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार कदम यांनी त्या गुन्ह्यात तक्रारदारांच्या वडीलांचा ताबा न घेण्यासाठी, अटक न करण्याकरीता व गुन्ह्यात मदत करण्याकरीता तक्रारदारांकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. पंरतु तक्रारदारांना कदम यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ८ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे याप्रकरणी तक्रार केली. त्याच्या आधारे मुंबई एसीबीने तक्रारीची पडताळणी केली.

आणखी वाचा-मुंबई : पत्राचाळीतील २,१७५ घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

८ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत कदम यांनी तडजोडीअंती चार लाख रुपये स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर एसीबीने याप्रकरणी तात्काळ सापळा रचून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना कदम यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर एन.आर.आय. पोलीस ठाण्यात कदम यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच प्रकरणात त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली असून वैद्यकीय तपासणीनंतर कदम यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी यापूर्वी स्वीकारलेल्या रकमेबाबतही तपास करण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार आरोपीच्या मालमत्तांचीही तपासणी करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.