मुंबई : टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल (५६) हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. तक्रारदाराला फसवणुकीतील रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तडजोडी अंती ३५ हजार रुपयांची रोकड स्वीकारताना त्यांच्यावर सोमवारी कारवाई करण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, परिचित महिलेने पतसंस्थेकडून पैसे दुप्पट करून देणार असल्याचे सांगून तक्रारदाराकडून सुमारे २७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी तक्रारदाराला केवळ १७ लाख ५० हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम परत करण्यास महिलेने टाळाटाळ केली. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने सदर महिलेच्या क्रेडिट सोसायटीत जाऊन पैशांची विचारणा केली. तेव्हा, महिलेने तक्रारदाराविरोधातच टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावून बागुल यांच्यासमोर हजर करण्यात आले. बागुल यांनी महिलेकडून पैसे काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाखांची मागणी केली. त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार, एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराने बागुल यांना पैसे कमी करण्यास सांगताच तडजोडीअंती ३५ हजार रुपयांवर बागुल तयार झाले. पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट होताच एसीबीने सापळा रचला. बागुल यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. एसीबीने ही रक्कम त्यांच्याकडून ताब्यात घेतली असून याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.

kondhwa police arrested robbers
पुणे: कोंढव्यात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड; तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी जप्त
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Wardha, Cheating, government treasury,
वर्धा : चहा, नाश्त्याच्या नावे शासकीय तिजोरीवर डल्ला, गुन्हा दाखल होताच आरोपी अधिकाऱ्याची…
dead lizard found in spice packet
Dead Lizard Found In Spices : धक्कादायक! पोषण आहाराच्या मसाल्यात चक्क पाल; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ…
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
thane education officer challenges suspension over badladpur sex assault in bombay hc
Badlapur Sexual Assault: निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
Bombay High Court restrained the constituent parties of the Mahavikas aghadi from calling a close Maharashtra to protest the Badlapur school case
बंदला प्रतिबंध, मविआतील पक्षांना उच्च न्यायालयाचा मज्जाव; बदलापूर अत्याचाराविरोधात आज राज्यभर मूक आंदोलन