ज्येष्ठ रणजीपटू आणि प्रशिक्षक सुरेश तिगडी यांचे वरळी गावातील निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. रणजी सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे सुरेश तिगडी प्रकाशझोतात आले होते. एक उत्तम प्रशिक्षक आणि प्रशासक म्हणून त्यांनी मुंबई क्रिकेट विश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनतर्फे अलिकडेच दिलीप वेंगसरकर यांनी सुरेश तिगडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गौरव केला होता.