जागतिक किर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार सदाशीव दत्तात्रय साठे (वय-९५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सूना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिल्पकलेच्या जगतात भाऊ या नावाने परिचित राहिलेल्या, सदाशीव साठे यांच्या निधनाची बातमी समजताच कला जगतातून शोक व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांकडून दुःख व्यक्त करण्यात आले असून, सदाशीव साठे यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची देखील अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुगंध मातीचा – वय वर्षे अठरा ते अठ्ठय़ाऐंशी हा माझा शिल्पकलेतील सत्तर वर्षांचा प्रवास कधी सरला ते मला कळलंच नाही.

सदाशिव साठे यांचा जन्म १७ मे १९२६ रोजी पेण येथील वावोशी गावात झाला होता. त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण जे जे स्कुल ऑफ आर्ट मधून घेतले होते. दिल्ली येथील महात्मा गांधी यांचे शिल्प त्यांनीच साकारलेले आहे. याशिवाय मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील त्यांनीच साकरलेला आहे. याशिवाय चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा, पुरंदर येथील मुरारबापू यांचा पुतळाही त्यांनीच साकारला आहे. त्यांनी मागील पाच दशकं शिल्पकलेत भरीव कार्य केले आहे. २०१९ मध्ये त्यांनी साकारलेल्या दांडी यात्रेच्या शिल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हे त्यांचे शेवटचे शिल्प ठरले. त्यांच्या शिल्पकलेची दखल घेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी देखील त्यांची भेट घेतली होती.

सदाशीव साठे हे कल्यामध्ये वास्तव्यास होते, त्यामुळे त्यांना कल्याण भूषण पुरस्काराही देण्यात आला होता. याशिवाय, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी या दोन्ही संस्थांकडून लाईट टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात येऊन, त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने जागतिक किर्तीचा शिल्पकार हरपला आहे.