मुंबई : विरार-चर्चगेट उपनगरी गाडीतून प्रवास करणाऱ्या एका सत्तर वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिलेचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अमितकुमार झा (२२) याला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. उपनगरी गाडीतून ही महिला रात्री साडेदहाच्या सुमारास माल डब्यातून एकटीच प्रवास करत होती. याच डब्यातून प्रवास करणाऱ्या अमितकुमार याने विरारहून गाडी सुटल्यानंतर तिची छेडछाड करायला सुरुवात केली. गाडी भाईंदर येथे पोहोचली तेव्हा त्या महिलेने आरडाओरड केली. प्रवासी गोळा झाले आणि त्यांनी अमितकुमारला पकडून पोलिसांच्या हवाली केले.रात्रीच्या वेळेस घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ज्येष्ठ महिलेचा लोकलमध्ये विनयभंग
मुंबई : विरार-चर्चगेट उपनगरी गाडीतून प्रवास करणाऱ्या एका सत्तर वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिलेचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अमितकुमार झा (२२) याला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. उपनगरी गाडीतून ही महिला रात्री साडेदहाच्या सुमारास माल डब्यातून एकटीच प्रवास करत होती. याच डब्यातून प्रवास […]
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 14-12-2015 at 00:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior woman molestation in local train