मुंबई : विरार-चर्चगेट उपनगरी गाडीतून प्रवास करणाऱ्या एका सत्तर वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिलेचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अमितकुमार झा (२२) याला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. उपनगरी गाडीतून ही महिला रात्री साडेदहाच्या सुमारास माल डब्यातून एकटीच प्रवास करत होती. याच डब्यातून प्रवास करणाऱ्या अमितकुमार याने विरारहून गाडी सुटल्यानंतर तिची छेडछाड करायला सुरुवात केली. गाडी भाईंदर येथे पोहोचली तेव्हा त्या महिलेने आरडाओरड केली. प्रवासी गोळा झाले आणि त्यांनी अमितकुमारला पकडून पोलिसांच्या हवाली केले.रात्रीच्या वेळेस घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा