मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने फोनवरून दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आहे. विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी ‘एएनआय’ला सांगितलं की, “पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. ‘मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत. विलेपार्ले परिसरातून बोलत आहे,’ असं त्या व्यक्तीने म्हटलं. नंतर या व्यक्तीने फोन बंद केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.”

दरम्यान, एटीएसने पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असताना दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडले आहे. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण यालादेखील अटक केली आहे. तसेच, दोघांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या अभियंता सिमाब काझी याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.

Story img Loader