लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. अनेक मतदार मतदान करण्यासाठी सकाळी ७ वाजता मतदान केंद्रांवर पोहोचले. मात्र मतदान केंद्रावर गेल्यावर अनुक्रमांक शोधण्यासाठी मतदारांचा बराच वेळ जात होता.

यंदा मतदार माहिती चिठ्ठी घरोघरी पोहोचली नसल्यामुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना आपला अनुक्रमांक मिळवावा लागत होता. मतदारांची माहिती ऑनलाईनवर उपलब्ध करण्यात आली असली तरी मोबाइल घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने अनुक्रमांक शोधण्यासाठी मतदारांना धावपळ करावी लागली.

आणखी वाचा-Raj Thackeray: वरळी विधानसभेत व्हायरल झालेल्या पत्रावर राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही शिंदे गटाला…”

मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने मतदानासाठी प्रथमच शक्य असेलेल्या ठिकाणच्या गृहसंकुलात मतदान केंद्रे (बूथ) उपलब्ध केली आहेत. त्यापैकीच एक मतदान केंद्र भायखळा मतदारसंघातील एका गृहसंकुलात उभारण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्यक्ष मतदान कक्षात मतदाराकडे अनुक्रमांकाची मागणी केल्यानंतर त्यांना रांग सोडून मतदार माहिती चिठ्ठी मिळविण्यासाठी गृहसंकुलाबाहेरील प्रवेशद्वारावर यावे लागत होते. तसेच अनुक्रमांक घेण्यासाठी आलेल्या मतदारांना माहिती चिठ्ठी मिळण्यास वेळ लागत होता. यामुळे मतदारांचा खोळंबा होत होता.

दरम्यान, भायखळा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. नवमतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदार केंद्रावरील अधिकारी नवमतदारांना मतदान यंत्राविषयी माहिती देत होते.