मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सावित्रीबाई फुले वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली. पीडित तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार झाल्याचाही संशय आहे. वसतिगृहातील सुरक्षा रक्षकानेच पीडितेवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने या कृत्यानंतर चर्नी रोड स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. यावर आता पीडित तरुणीच्या भावाने प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत.

पीडित तरुणीचा भाऊ म्हणाला, “दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गूण मिळाल्यावर ती एप्रिल २०२१ मध्ये मुंबईत आली होती. तिने वांद्रे येथील महाविद्यालयात तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. मुंबईत आल्यापासून ती सावित्रीबाई फुले वसतिगृहातच रहात होती.”

Kuldeep Sengar Bail
Kuldeep Sengar Bail : उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगरला अंतरिम जामीन, AIIMS मध्ये होणार शस्त्रक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
Auto rickshaw driver arrested for raping young woman
मुंबई : तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
RG Kar rape-murder case verdict
RG Kar Rape-Murder Case : संजय रॉयला फाशीऐवजी जन्मठेप का झाली?

“परीक्षा संपली त्याच दिवशी ही घटना घडली”

“सोमवारी परीक्षा संपल्यावर ती पुन्हा अकोल्याला येणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचं आरक्षणही केलं होतं. मीही शुक्रवारी ती येण्याची वाट पाहत होतो. मात्र, ज्या दिवशी तिची परीक्षा संपली त्याच दिवशी ही घटना घडली,” अशी माहिती पीडित तरुणीच्या भावाने दिली.

“आई वडिलांवर या वयात आर्थिक ताण येऊ नये असं तिला वाटायचं”

पीडितेचा भाऊ पुढे म्हणाला, “आपल्यामुळे आपल्या आई वडिलांवर या वयात आर्थिक ताण येऊ नये असं तिला कायम वाटायचं. ती मला कायम सांगायची की, मी खूप मेहनत घेईल आणि आई-बाबांना आर्थिक अडचणी येऊ देणार नाही.”

“सुरक्षारक्षक थेट तिच्या रुममध्ये यायचा आणि…”

“ही घटना घडण्याआधी तिने पुन्हा एकदा सुरक्षारक्षकाच्या वर्तनाची तक्रार केली होती.याआधीही तिने सुरक्षारक्षक थेट तिच्या रुममध्ये येतो आणि हेतूपूर्वक बोलतो, अशी तक्रार केली होती. कधीकधी लाईट बंद करतो. मात्र, आम्ही तिला सांगितलं की, आम्ही वॉर्डनला याबाबत तक्रार केली आहे. तसेच यानंतर परिस्थिती सुधारेल असंही आम्हाला वाटलं,” अशी माहिती पीडितेच्या भावाने दिली.

हेही वाचा : “मी उपस्थित केलेली शंका खरी ठरली, पीडित तरुणीला…”, मुंबईतील बलात्कार-हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

“माझ्या वडिलांनी तिला खोलीला कुलुप लावण्यास सांगितले”

“सोमवारी तिने पुन्हा एकदा तक्रार केली. त्यावेळी आम्ही विचार केला की, तो तिचा शेवटचा दिवस आहे. ती अकोल्याला घरी येण्याआधी एका नातेवाईकांकडे जाणार होती. त्यामुळे माझ्या वडिलांनी तिला खोलीला कुलुप लाव आणि खोलीमध्येच थांब असं सांगितलं,” असंही त्याने नमूद केलं.

Story img Loader