लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई: घरकाम करणाऱ्या नोकराने घरात कोणी नसताना चार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली होती. याबाबत टिळकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरलेले काही दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
घाटकोपरमधील राजावाडी परिसरातील ‘अलकनंदा’ इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या दर्शना देसाई (६३) आठ दिवसांपूर्वी कामानिमित्त दिल्ली येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या धाकुबाबाने (४५) घरामधील कपाटातील सोन्याचे दागिने, घड्याळ आणि रोख रक्कम असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
हेही वाचा… आषाढी एकादशीनिमित्त ८ लाख ८१ हजार वारकऱ्यांनी एसटीतून केला प्रवास
दिल्ली येथून परतल्यानंतर देसाई यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून धाकुबाबाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी काही मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.