मालकाच्या घरात केलेल्या चोरीचा पश्चाताप झाल्याने प्रभादेवी येथे २० वर्षीय नोकराने रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. रजनीश जोगेश्वर प्रजापती असे या नोकराचे नाव आहे.
प्रभादेवीच्या नगेद अपार्टमेंट येथे राहणाऱ्या मोहनसिंग परमार यांच्या घरात रजनीश काही वर्षांंपासून नोकराचे काम करायचा. दिवाळीनिमित्त मोहनसिंग यांच्या पत्नीचे भाऊ घरी आले होते. त्यावेळी मोहनसिंग यांच्या कपाटातील काही पैसे कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोधाशोध केल्यानंतर त्यांनी रजनशीकडे विचारणा केली. सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. रजनीशच्या बॅगेत लपवलेले ३२ हजार रुपये परमार यांना सापडले. चोरलेले आणखी २० हजार रुपये आपला मित्र देवेंद्र याच्याकडे ठेवल्याचे रजनीशने सांगितले. त्यामुळे रविवारी सगळेजण त्या मित्राच्या घरी गेले होते. मात्र तेथे अधिक पैसे मिळाले नाहीत़  त्यावर, आणखी पैसे कुठे लपवले आहेत, अशी विचारणा रजनीशकडे करण्यात आली. तेव्हा मी पैसे गच्चीवर ठेवले आहेत़  ते घेऊन येतो, असे सांगून तो गच्चीवर गेला आणि गच्चीतूनच उडी मारून त्याने आत्महत्या केली.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा