मुंबई : मुंबईतील घाटकोपर – वर्सोवा मार्गावर धावणारी ‘मुंबई मेट्रो १’ ची वाहतूक सेवा बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून काही तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्यांची गैरसोय झाली. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीअंती घाटकोपर-वर्सोवादरम्यानची मेट्रो वाहतूक सुरळीत सुरूअसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले. तसेच प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरीही व्यक्त केली. मात्र तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण समजू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : अजित पवार नाराज असल्याने मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर असल्याच्या चर्चा, सुनील तटकरे म्हणाले…

मेट्रोमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सुमारे ३५ मिनिटांपासून मुंबईतील ‘मेट्रो-१’च्या वाहतुकीला याचा फटका बसला. यामुळे मेट्रोची सेवा साधारण १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मेट्रोमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. सकाळच्या वेळी मेट्रोमध्ये मुंबईतील लोकल इतकीच गर्दी असते. यावेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. परंतु, तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती केल्यानंतर मेट्रो सेवा सुरळीत सुरू झाली, असे ‘मुंबई मेट्रो १’च्या प्रशासनाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Services of mumbai metro 1 ghatkopar to versova disrupted due to technical glitch mumbai print news css
Show comments