विविध शैक्षणिक समस्या, प्रशासकीय समस्या यावर विचारमंथन करण्यासाठी ‘राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळा’तर्फे दरवर्षी अधिवेशन अयोजित केले जाते. यंदाचे ५३वे  अधिवेशन ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत नगर येथे पार पडणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री अजितदाद पवार, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, कृषीमंत्री राधाकृष्ण पाटील, कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते, मधुकर पिचड, सुभाष माने व अरूण थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या अधिवेशनाचे आयोजन अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाने केल्याचे संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांनी सांगितले.

Story img Loader