या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिंचन घोटाळ्याच्या पहिल्या आरोपपत्रात अधिकारी आणि ठेकेदारांची नावे असली तरी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. अजितदादांवरून भाजप आणि राष्ट्रवादीत काही समझोता झाला का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन आणि बांधकाम खात्यातील घोटाळ्याची चौकशी करण्याचा आदेश देत दोषींची सरकार गय करणार नाही, असा इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळ्याची चौकशी होऊन तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे भवितव्य काय, असा सवाल केला जात होता. भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना हात लावायचा नाही, असा गुप्त समझोता राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झाल्याची चर्चा आहे.

सिंचन घोटाळ्यातील पहिले आरोपपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात अधिकारी आणि ठेकेदारांची नावे आहेत. मात्र, ठेकेदारावर वरदहस्त दाखविणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही. कोकण सिंचन मंडळातील घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. या ठेकेदाराचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याशी घनिष्ठ संबंध होते, अशी माहिती पुढे आली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीतील पडद्याआडून झालेल्या हालचालींमुळे अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कृपादृष्टी दाखविली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.