मुंब्रा शीळ येथील लकी कम्पाउंडमध्ये कोसळलेल्या सात मजली इमारतीच्या दुर्घटनेप्रकरणी आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यांत ही अनधिकृत इमारत उभारणाऱ्या जमील कुरेशी आणि सलीम शेख या दोघा बिल्डरांना अनुक्रमे उत्तर प्रदेश व ठाण्यातून अटक करण्यात आल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले. त्याशिवाय निलंबित करण्यात आलेले डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर दीपक चव्हाण, एएमसी बाळासाहेब आंधळे, सीनियर पोलिस इंस्पेक्टर सईद, राष्ट्रवादीचे नगरसेवक हीरा पाटिल आणि एएमसीचे क्लार्क महेश मुर्के यांना देखिल अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा, बेजबाबदारपणा आणि कटकारस्थानाचा आरोप लावण्यात आला आहे. सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.
ढिगारा उपसण्याचे काम तब्बल ४२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर शनिवारी सकाळी पूर्ण झाले. या दुर्घटनेत बळी पडलेल्या मृतांचा आकडा आतापर्यंत ७४ झाला असून यामध्ये २२ महिला व १७ लहान मुला-मुलींचा समावेश आहे.

Story img Loader