मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी एलटीटी यार्डमधील कामासाठी ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान मध्यरात्री मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहेत. सात दिवसीय ब्लाॅकमध्ये निरनिराळी कामे हाती घेण्यात येणार असून अनेक एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११/१२ फेब्रुवारी (रविवार/सोमवार)

कालावधी: रात्री १०:३० ते मध्यरात्री ३:३० पर्यंत

परिणाम: नादुरूस्त लाइन प्लेसमेंटवर परिणाम होईल. देखभाल दुरुस्ती मार्गिकेवरील रेकचे आगाऊ नियोजन करण्यात येईल.

हेही वाचा >>>ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध

१२/१३ फेब्रुवारी २०२४ (सोमवार / मंगळवार)

कालावधी: रात्री १०:३० ते मध्यरात्री ३:३० पर्यंत

गाड्यांचे वेळापत्रक : गाडी क्रमांक १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३५ वाजता सुटणारी १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे. गाडी क्रमांक २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस १३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३५ वाजता सुटणारी १३ फेब्रुवारी रोजी रात्री १.२० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेस १३ फेब्रुवारी रोजी (मंगळवार) सकाळी ११.३० वाजता सुटणारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १२:१५ वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे. गाडी क्रमांक २२८४७ विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला १२ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे अखेरचा थांबा असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven day megablock lokmanya tilak terminus of central railway mumbai print news amy
Show comments