मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सारेजण उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर नववर्षाची सुरुवातच मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. २०२५ च्या जानेवारी महिन्यात जवळपास सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. नवनवीन मराठी चित्रपटांची निर्मिती ही सकारात्मक बाब आहे, मात्र महिन्याभरात लागोपाठ प्रदर्शनामुळे मराठी चित्रपटांना आपसातच स्पर्धेचा सामना करावा लागल्यास आर्थिक यश साधणे कठीण होईल, असे मत मराठी चित्रपटकर्मींनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दसरा व दिवाळी सणांनंतरचा सुट्टीचा माहौल लक्षात घेत प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’, ‘भूल भुलैया ३’, ‘पुष्पा २’ आदी हिंदी चित्रपटांनी तिकीट खिडकीवर बक्कळ कमाई केली. मात्र त्यामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांत कमी शो मिळाले. तर हिंदी चित्रपटांच्या गर्दीत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी काही मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे गेले दोन महिने रखडलेले आणि काही नवीन चित्रपट असे मिळून जानेवारीत सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. विविधांगी कथा आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेले हे चित्रपट एकाच महिन्यात प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षक नेमके किती आणि कोणते चित्रपट पाहणार? हा प्रश्न निर्मात्यांच्या मनात असून परिणामी प्रेक्षक विभागले जाण्याची भीतीही आहे.

हेही वाचा…‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र

‘कथा उत्तम असल्यास प्रेक्षकांना संबंधित चित्रपट पाहायला आवडतो. कौटुंबिक कलह, हाणामारी, गुन्हेगारी या पद्धतीच्या चित्रपटांच्या पलीकडे जाऊन प्रेक्षक नाविन्यपूर्ण कथा असलेले चित्रपट पाहणे पसंत करतात. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या गर्दीत प्रेक्षक स्वतःच्या आवडीच्या चित्रपटांचीच निवड करतील. आम्ही तीन वेगवेगळ्या काळातील प्रेमकथा सरळ साध्या पद्धतीने मांडली आहे’, असे ‘इलू इलू १९९८’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अजिंक्य फाळके यांनी सांगितले.

हेही वाचा…कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी

जानेवारी महिन्यात मराठी चित्रपटांची ‘सत्ता’

१ जानेवारी : मु. पो. बोंबिलवाडी
१० जानेवारी : संगीत मानापमान

१७ जानेवारी : जिलबी, मंगला

२४ जानेवारी : फसक्लास दाभाडे

३१ जानेवारी : इलू इलू १९९८, मुक्काम पोस्ट देवाचं घर

निर्मात्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक

एकाच वेळी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यास निश्चितच स्पर्धा निर्माण होईल. परिणामी प्रेक्षकांनाही खर्चाचा मेळ जमवणे कठीण जाईल. सध्या मराठी चित्रपटसृष्टीसमोर बॉलिवूड, हॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपट आणि ओटीटी माध्यमांचे आव्हान असल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीने एकजुटीने उभे राहण्याची गरज असून निर्मात्यांनी आपापसांत समन्वय साधणे आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होणे चांगली गोष्ट आहे, मात्र वर्षभरात मोजक्या पण दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाल्यास चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढेल आणि आर्थिक यशही साधता येईल. तसेच चित्रपटगृहांनंतर मराठी चित्रपटांना प्रथितयश ओटीटी माध्यमांवरही योग्य स्थान मिळेल. मधुगंधा कुलकर्णी, निर्माती, ‘मु. पो. बोंबिलवाडी’