दोन आरोपींकडून मेजवानी झोडणाऱ्या सात पोलिसांना शुक्रवारी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांनी निलंबित केले. दिल्ली सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलीस गुरुसिंग आणि सुमित नरुला या आरोपींना दिल्लीत घेऊन गेले होते. न्यायालयातील हजेरी लागल्यानंतर या आरोपींनी नवी मुंबईतील सात पोलिसांना आपल्या घरी मेजवानी दिली. मद्य, मांसाहाराच्या या मेजवानीत आरोपींनी पूर्वकटानुसार गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे भोजनानंतर पोलीस बेशुद्ध पडले. त्यानंतर दोघे आरोपी फरार झाले.
नवी मुंबई पोलिसांना बदनाम करणारे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग काळे, कॉन्स्टेबल आनंद राजगिरी, संतोष भोसले, ओंकार ठाकरे, ए.बी. बापट, श्रीनिवासन देवकी आणि परदेशीसिंग गोकूळ या सात जणांना आयुक्त शर्मा यांनी निलंबित केले.     

Story img Loader