मुंबई : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर सात आसनी फिरती शौचालये उभी केली जाणार आहेत. गिरगाव चौपाटीपासून गोराईपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर २४ ठिकाणी ही चाकांवरील फिरती शौचालये कायमस्वरूपी उभी केली जाणार आहेत. वर्षभरापूर्वी बारगळलेल्या या योजनेसाठी पालिकेने आता पुन्हा एकदा निविदा मागवल्या आहेत. महिला, पुरुष व अंपंगांसाठी अशी सात शौचकूपे प्रत्येक ठिकाणी असणार आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर शौचालय बांधण्यास परवानगी नाही. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची प्रसाधनगृहाअभावी गैरसोय होते. तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात असलेल्या गावठाणांमधील रहिवाशांमुळे समुद्रकिनाऱ्यावर अस्वच्छता होऊ शकते. त्यामुळे मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने गेल्यावर्षी समुद्रकिनाऱ्यांवर फिरती शौचालये उभारण्याचे ठरवले होते. राष्ट्रीय हरीत न्यायासनाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) समुद्रकिनाऱ्यांजवळ हागणदारी होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या होत्या. राष्ट्रीय हरीत न्यायासनाने नेमून दिलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर ही शौचालये उभारण्यात येणार होती. मात्र कंत्राटदाराने हे काम पूर्ण न केल्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता मात्र नव्याने या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या असल्याची माहिती घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेने या कामासाठी मुंबई मेरिटाईम बोर्डची परवानगी घेतली असून लवकरच या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – बांगलादेशी हवाला रॅकेट प्रकरण : नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक
निविदा प्रक्रिया व संपूर्ण प्रशासकीय मंजुरी घेतल्यानंतर चार महिन्यांत मुंबईत २४ ठिकाणी ही शौचालये उभारली जाणार आहेत. चाकांवर असलेली ही शौचालये जमिनीपासून कमी उंचीवर असतील व त्याला किंचित उतारही (रॅम्प) असेल. त्यामुळे अपंगांना या शौचालयात जाणे सोपे जाईल. सात शौचकूपांपैकी तीन पुरुषांसाठी, तीन महिलांसाठी व एक अपंगांसाठी असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या शौचालयात वीजेच्या पुरवठ्यासाठी सौर उर्जेचा वापर केला जाणार आहे. तसेच मलमूत्राच्या विल्हेवाटीसाठी जैविक प्रक्रियेचे तंत्रज्ञान वापरले जाणार असून जिथे जास्त वापर होतो त्याठिकाणी पालिकेच्या मलमूत्र विल्हेवाटीशी संबंधित गाड्या पाठवल्या जाणार आहेत. एक वर्षाचे परिरक्षण व प्रचालन या कंत्राटात समाविष्ट असणार आहे. या एका शौचालयाची किंमत सुमारे ११ ते १२ लाख रुपये आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी पालिकेला ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली; नौदलातील तरुणाला अटक
कुठे असणार ही शौचालये?
गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम समुद्र किनारा, माहीम कॉजवे, जुहू कोळीवाडा, वर्सोवा, खारदांडा कोळीवाडा, चिंबई समुद्रकिनारा, मार्वे, गोराई या समुद्रकिनाऱ्यांवर ही पूर्वनिर्मित (प्रिफ्रॅब्रिकेटेड) २४ शौचालये उभारली जाणार आहेत.