मुंबई : मेट्रो ४, ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) आणि मेट्रो १० (गायमुख-मिरारोड) मार्गिकेतील रखडलेल्या मोघरपाडा कारशेडच्या कामाला आता लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कारशेडच्या कामासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तीन निविदा सादर झाल्या असून त्यात एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग या संयुक्त कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे. त्यामुळे या कंपनीला कामाचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई शहरातील तसेच ठाणे आणि मिरारोड शहरातील अंतर कमी करण्यासाठी मेट्रो ४, ४ अ आणि १० अशा मार्गिका हाती घेण्यात आल्या आहेत. मेट्रो ४, ४ अ ची मार्गिका ३५.२५ किमी लांबीची आहे. तर मेट्रो १० ची मार्गिका ९.२ किमी लांबीची आहे. मेट्रो ४ मार्गिकेचा विस्तार मेट्रो ४ अ च्या माध्यमातून तर मेट्रो ४ अ चा विस्तार मेट्रो १० च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या तिन्ही मार्गिकेचे कारशेड एकाच ठिकाणी अर्थात मोघरपाडा येथे बांधण्यात येणार आहे. दरम्यान मोघरपाडा येथे कारशेड बांधण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध असल्याने कारशेड वादात अडकली होती. मेट्रो मार्गिकांची कामे वेगाने पुढे जात असताना कारशेड रखडल्याने एमएमआरडीएची चिंता वाढली होती. पण अखेर कारशेडला असलेला विरोध मोडून काढण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. हा वाद मिटल्याने एमएमआरडीएने ऑगस्ट २०२२ मध्ये मोघरपाडा कारशेडच्या कामासाठी निविदा मागविल्या होत्या.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास

हेही वाच – राज्यात करोनाचे ५४२ नवे रुग्ण; ४,३६० उपचाराधीन, एकाचा मृत्यू

हेही वाचा – ‘‘अदानी’बाबत शरद पवार यांचा पुनरुच्चार; न्यायालयाची समितीच प्रभावी!

नुकत्याच एमएमआरडीएकडून आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ७११.३४ कोटी रुपये खर्चाच्या कारशेडच्या कामासाठी तीन निविदा सादर झाल्या आहेत. एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग (संयुक्त), एनसीसी लिमिटेड आणि रित्विक प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपनीच्या या निविदा आहेत. यातील रित्विक प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडची निविदा अपात्र ठरली आहे. त्यामुळे एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग (संयुक्त) आणि एनसीसी लिमिटेड या दोन कंपन्या स्पर्धेत आहेत. यात एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंगची (संयुक्त) आर्थिक निविदा सर्वात कमी आहे. ९०५.७७ कोटी रुपये अशी बोली या कंपनीने लावली आहे. त्यामुळे या कंपनीला कारशेडच्या कामाचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. कारशेडच्या कामासाठीच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. या निविदांची छाननी सुरू आहे. त्यानुसार लवकरच निविदा अंतिम करण्यात येईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. दरम्यान आता लवकरच निविदा अंतिम करून कामास सुरुवात करण्यात येणार आहे. काम सुरू झाल्यापासून ३६ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.