शिवडी रेल्वे स्थानकाजवळची महापालिकेची जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास रुळांवर पाणी येऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. लोकल अत्यंत धीम्या गतीने १५ ते २० मिनिटे उशिरा धावत असल्याने संध्याकाळी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.
येथे जलवाहिनी रेल्वेस्थानकाच्या खालून जाते. सायंकाळी ही जलवाहिनी फुटून पाणी रेल्वेमार्गावर साचण्यास सुरुवात झाली. रुळांवर पाणी आल्याने लोकलगाडय़ांचा वेग मंदावला आणि हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वेसेवा कोलमडली. गाडय़ा सुमारे २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रुळांवर पाणी आल्याने गाडय़ा धीम्या गतीने चालवण्यात आल्या. त्यामुळे हार्बर मार्गावरील गाडय़ा दहा मिनिटे विलंबाने धावत होत्या, असे स्पष्टीकरण रेल्वेच्या प्रवक्त्याने दिले.

Story img Loader