चेंबूर येथे मसाज पार्लरमध्ये मुली पुरवून सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर मुख्य आरोपीला पकडण्यात आरसीएफ पोलिसांना यश मिळाले. सेक्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुलतान हसन गनी अन्सारी ऊर्फ बबलूला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
चेंबूरमधील सी. जी. गिडवाणी मार्गावर सी मॅक्स मॅक्स मसाज पार्लर होते. मसाजच्या नावाखाली या पार्लरमध्ये सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पोलिसांना गेल्या वर्षी मेमध्ये मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या पार्लरवर छापा घातला आणि ताब्यात घेण्यात आलेल्या दोन महिला आणि एका दलालाला आरसीएफ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर हे तिघेही जामिनावर मुक्त झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा