तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास टाळाटाळ करणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने कोळसेवाडी पोलिसांना दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल डोंगरे (वय २२), वडील शशिकांत, आई रेश्मा, भाऊ मिलिंद अशी आरोपींची नावे असून ते कल्याण पूर्वेतील सूचकनाका येथे राहतात. याच भागात एक वीस वर्षांची तरुणी राहते. राहुलने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या लग्नाला राहुलच्या घरच्यांनीही संमती दिली होती. राहुल तरुणीला डोंबिवलीच्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. राहुल या तरुणीला भेटण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर तरुणीने याप्रकरणी कल्याण न्यायालयात दाद मागितली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा