जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामधून स्पष्ट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : लिंगविसंगती किंवा तृतीयपंथ हा यापुढे मानसिक आजार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आजारांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण (इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज-११) अहवालामध्ये स्पष्ट केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना दर दहा वर्षांनी आजारांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण (आयसीडी) अहवाल जाहीर करते. संघटनेने सोमवारी या अहवालाची ११ वी आवृत्ती जाहीर केली आहे.
ताज्या अहवालानुसार, शारीरिक लिंग आणि लिंगभाव यामध्ये विसंगती असणे या स्थितीला मानसिक आजारामधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पौगंडावस्थेमध्ये किंवा तारुण्यामध्ये शारीरिक लिंग आणि लिंगभाव यामध्ये विसंगती जाणवणे हा मानसिक आजार नाही, असे स्पष्ट होत आहे. तेव्हा अशा द्विधावस्थेत असलेल्या व्यक्तींबाबत समाजामध्ये असलेला नकारात्मक दृष्टिकोन कमी करणे आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणे करणे या हेतूने हा बदल अहवालामधून अधोरेखित करण्यात आला आहे.
एखाद्या मुलाला लिंगविसंगती असल्याचे आढळून आल्यास त्याला मानसिक आजार तर नाही ना, असा प्रश्न पडतो. भारतामध्ये हे मोठय़ा प्रमाणात नसले तरी काही देशांमध्ये अजूनही ही समजूत आहे. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने आयसीडीच्या माध्यमातून हे स्पष्ट केल्याने अशा व्यक्तींबाबत समाजामध्ये अपसमज राहणार नाही, असे केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.
आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात
भारतामध्ये तृतीय पंथ हा समाज पूर्वापारपासून असून त्याला स्वीकारले आहे. त्यामुळे हा मानसिक आजार असल्याचे भारतामध्ये नसले तरी काही देशांमध्ये ही विसंगती स्वीकारली गेलेली नाही. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, अशी अपेक्षा आहे, असे तृतीयपंथीय हक्क कार्यकर्ती लक्ष्मी त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
आयसीडी म्हणजे काय?
आयसीडी अहवालाच्या माध्यमातून जगभरातील आरोग्य क्षेत्रातील कल आणि आकडेवारींचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर विविध प्रकारच्या इजा, आजार आणि मृत्यूची कारणे यांना सांकेतिक शब्द दिले जातात. आतापर्यंत ५५ हजार आजारांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांमध्ये आरोग्यांबाबत एक समान भाषेचा वापर केला जातो, ज्यामुळे या आजारांबाबत त्यांना माहितीची देवाणघेवाण करणे सोपे जाते.