राज्यभर गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरु असताना भक्तांच्या आनंदाला उधाण आले आहे. मात्र, मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर चावा घेणाऱ्या पाखट माशांच्या उपस्थितीमुळे गणेश भक्तांमध्ये काहिसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्यात गेल्यावर चावा घेणाऱ्या पाखट माशांचा उपद्रव वाढल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली.
एक मीटरपेक्षा खोल पाण्यात या माशांचा वावर असल्याने खोल पाण्यामध्ये न जाण्याचे आवाहन महापालिकेने गणेश भक्तांना केले आहे. उथळ पाण्यात देखील काळजी घेण्याचा सल्ला महापालीकेने नागरीकांना दिला आहे.
दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर समुद्रात उतरलेल्या भाविकांना पाखट माशाने चावा घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर शासकीय आणि पालिका यंत्रणेने गिरगाव चौपाटीवर जाऊन पाहणीही केली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गिरगाव चौपाटीवर पाखट माशासंबंधात उपाययोजना करण्यात अपयश आल्यामुळे बाप्पाला निरोप देताना भाविकांना पाखट माशांच्या दहशतीतच विसर्जन करावे लागणार आहे.

Story img Loader