मुंबईतल्या शाह पेपर्स कंपनीवर ३५० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून कालपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, आज (११ एप्रिल) आयकर विभागाने शाह पेपर्स कंपनीशी संबंधित १८ ठिकाणी छापेमारी केली. मुंबईसह गुजरातमधल्या वापी येथे ही छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत आतापर्यंत २ कोटी रुपये रोख रक्कम आणि २ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आता ही कारवाई किती दिवस चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाह पेपर्स कंपनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांची पुरवठादार कंपनी आहे. या छापेमारीसंबंधीचं वृत्त टीव्ही ९ माराठीने प्रसिद्ध केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा