गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला अभिनेता शाहरूख खानचा ‘दिलवाले’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करू न शकल्याने खुद्द शाहरूख खान नाराज झाला आहे. चित्रपटाने अपेक्षे इतका व्यवसाय न केल्याने त्याने आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी देशभरात प्रदर्शित झाले होते. ‘दिलवाले’च्या तुलनेत संजय लीला भन्सालींच्या ‘बाजीराव मस्तानी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
‘दिलवाले’मध्ये शाहरूख खानसोबत अभिनेत्री काजोलने खूप वर्षांनंतर काम केले होते. त्यामुळे या चित्रपटाकडे बॉलीवूडचे विशेष लक्ष होते. शाहरूख म्हणाला, या चित्रपटाने जितका चांगला व्यवसाय करायला हवा होता, तितका झालेला नाही. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे मी स्वतः खूप नाराज झालो आहे. देशामध्ये तर या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली. पण जर्मनी, ऑस्ट्रिया या देशांसह परदेशात या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. हिंदी चित्रपट परदेशात इतकी छान कामगिरी करू शकतात, हे खूप महत्त्वाचे आहे. परदेशात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे त्याने सांगितले.
रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि रोहित शेट्टी प्रॉडक्शन यांनी एकत्रितपणे निर्मिती केलेल्या ‘दिलवाले’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींची कमाई केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा