ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब केलं.

या घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. संजय राऊत हे आगलावे आहेत. ते टेंभा घेऊन महाराष्ट्रात आग लावत फिरतात, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
Mira Road, Bangladesh nationals arrested ,
सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा- “संजय राऊत डाकू आहे डाकू, त्याच्यावर…”, थेट शिवी देत संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले, “संजय राऊत हे आगलावे आहेत. महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्टं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका.” अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी टीकास्त्र सोडलं.

हेही वाचा- “डान्सबारचे अध्यक्ष शेट्टींप्रमाणे संजय राऊतांना शिक्षा द्यावी”, गुलाबराव पाटलांची मागणी

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत यांचे धाकटे बंधू सुनील राऊत यांनी संजय राऊतांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. याबाबत विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले, “एकाच आई-बापाची दोन पोरं सारखीच आसतात. ते काळू बाळू आहेत.”

Story img Loader