‘चेन्नई एक्सप्रेस’च्या दणदणीत यशानंतर शाहरुख खान आणि रोहित शेट्टी ही जोडी आता मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत चमकणार आहे.
रोहित शेट्टीने शाहरुख खानशी मराठी चित्रपटाचा विषय आणि त्यासंदर्भात आधीच चर्चा केली होती. या विषयावर आपण काही करु शकतो का, असे विचारताच शाहरुखने लगेच होकार दिला. या मराठी चित्रपटासाठी कलाकारांची निवड सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. या चित्रपटाची पटकथा लिहून पूर्ण झाल्याचेही समजते. रोहितला मराठी थोडय़ाफार प्रमाणात कळत असल्याने त्याने यातील अनेक गोष्टींवर बारकाईने लक्ष दिले आहे. मराठीतील हा सर्वात बिग बजेट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-08-2013 at 12:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan and rohit shetty together for marathi movie