अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे (पश्चिम) येथील बंगल्यावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी सुमारे आठशे चाहते जमले होते. त्यातील दोन चाहत्यांचे महागडे आय फोन चोरीला गेले असून पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

शाहरुख खान याला पाहण्यासाठी बँडस्टँड येथील मन्नत बंगल्याबाहेर सुमारे आठशे लोक जमले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास खान आपल्या बंगल्याच्या गच्चीत आला आणि त्याच्या चाहत्यांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या. वांद्रे पोलीस ठाण्यातील ४० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर तैनात होते. यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. पण गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोबाईल चोरले.

Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच

याबाबत एक पुरुष आणि एका महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार केली आहे. याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे प्रत्येकी एक लाख रुपये किमतीचे आयफोन चोरीला गेले.

शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या गर्दीत मोबाईल चोरीला जाण्याची, ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये किमान १२ चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले होते. २०१९ मध्ये दोन चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले होते.