मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३४ वर्षीय सावत्र पित्याला शाहू नगर पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या पत्नीनेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई ११ जानेवारी रोजी कामासाठी बाहेर गेली असताना पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपीने तिच्या जवळ जाऊन तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तिचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. आरोपीने तिला धमकावून याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने भीतीने कोणालाही हा प्रकार सांगितला नाही. अखेर पीडित मुलीने नुकताच तिच्या आईला याबाबत सांगितले. त्यानुसार आईने शुक्रवारी याप्रकरणी शाहू नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून शुक्रवारी सायंकाळी आरोपीला राहत्या घरातून अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahu nagar police arrested 34 year old stepfather who tried to molest minor girl mumbai print news sud 02