मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दीपक केसरकर हे मुंबई शहर जिल्ह्याचे, तर मंगलप्रभात लोढा हे  उपनगर जिल्ह्याचे, तर शंभूराजे देसाई हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर लोढांकडे मुंबई उपनगरची धुरा; विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे

मुख्यमंत्री शिंदे सरकारचा विस्तार होऊन दीड महिना उलटला, तरी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे गेले तीन महिने जिल्हा नियोजन समित्यांचे कामकाज ठप्प होते आणि विकासकामे अडली होती. त्यामुळे अखेर भाजप व शिंदे गटामध्ये पालकमंत्रीपदांचे वाटप होऊन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालकमंत्र्यांकडील जिल्ह्यांची संख्या कमी केली जाईल.

हेही वाचा >>> भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेचा खडसेंकडून इन्कार; अमित शहा-खडसे यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

नवीन पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

  • दीपक केसरकर- मुंबई शहर, कोल्हापूर.
  • अतुल सावे- जालना, बीड. 
  • शंभुराज देसाई- सातारा, ठाणे.
  •   मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर.
  • सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया.
  • चंद्रकांत दादा पाटील- पुणे.
  • विजयकुमार गावित- नंदुरबार.
  • गिरीश महाजन-धुळे, लातूर, नांदेड.
  • गुलाबराव पाटील- बुलढाणा, जळगाव. 
  • दादा भुसे- नाशिक.
  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम.
  • सुरेश खाडे- सांगली. 
  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड.
  • तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव).
  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग.
  • अब्दुल सत्तार- हिंगोली.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai minister thane fadnavis has the responsibility vidarbha ysh