बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर अपघातावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांना शिंदे-फडणवीस सरकारला एक आठवणही करून दिली. पवारांनी शनिवारी (१ जुलै) ट्वीट करत भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरद पवार म्हणाले, “बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृद्धी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत अशी प्रार्थना.”

“मी एक आठवड्यापूर्वीच आकडेवारी देत चिंता व्यक्त केली”

“बुलढाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत मी एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. तसेच राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी केली होती. अपघात रोखण्याच्यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असेही सुचवले होते,” अशी आठवण शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला करून दिली.

“समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे सुरुवातीपासून अपघातांची मालिका”

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर बुलढाणा-सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृद्धी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला.”

“प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर”

“दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शिवाय दुर्घटनेत जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही करतो. या भीषण दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी अजित पवार यांनी केली.

हेही वाचा : “समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…”, बस अपघातातील २५ मृत्यूंवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे वारंवार अपघात”

“समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरू आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा,” असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

समृद्धीवर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच जखमी झालेल्या प्रवाशांना योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी केली. ते म्हणाले, “समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला आहे. खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेगमर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे.”

हेही वाचा : समृद्धी महामार्गावरील अपघात नेमका कसा झाला? घटनाक्रम सांगत पोलीस म्हणाले, “डिझेल टँक…”

“समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण राष्ट्रवादी परिवार सहभागी आहे,” अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली.