मुंबईत विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत १३ जणांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे. बैठकीनंतर ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपाने विरोधकांवर अहंकारी म्हणून टीका केली. पण, अहंकारी कोण आहे? हे यातून स्पष्ट होते, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी भाजपाला दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “पुढील रणनिती ठरवण्याचं काम दोन दिवसांच्या बैठकीत करण्यात आलं. देशात अनेक गंभीर समस्या आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. देशात शेतकरी, कष्टकरी, तरूणांच्या समस्या आहेत. लोकांनी विश्वासने देशाची सत्ता भाजपाच्या हातात दिली. पण, भाजपाविरोधात ठिकठिकाणी नाराजीचं वातावरण दिसत आहे.”

हेही वाचा : “खोटं बोला, पण…”, मराठी म्हणीचा वापर करत खरगेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

“राजकीय पक्ष एकत्र येत काम करत आहे. त्यांच्या काम आणि नितीबद्दल शंका असू शकते. पण, मुंबईतील इंडियाच्या बैठकीवर भाजपाच्या लोकांनी टीका केली. जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची अपेक्षा आहे. मात्र, याच्यापासून नेतृत्व करणारे लांब गेले आहेत,” असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं.

“विरोधकांवर भाजपाचे नेते अहंकारी म्हणून टीका करतात. पण, याने स्पष्ट होतं, अहंकारी कोण आहे… राजकीय पक्ष एकत्र आलेले काहींना आवडत नाही. त्यांनाच अहंकारी बोललं पाहिजे,” असा हल्लाबोल शरद पवारांनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…

“आम्ही थांबणार नाही. चुकीच्या मार्गाने आम्ही जाणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना सरळ मार्गावर आणून. पण, जे येणार नाहीत, त्यांना बाजूला करण्याचं काम आम्ही खांद्याला खांदा लावून करू. देशासमोर एक स्वच्छ आणि चांगलं प्रशासन देण्याचं काम आम्ही करणार,” असं शरद पवारांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar attacks bjp over ghamandia alliance ssa