मुंबई : अनेक राज्यांत भाजपविरोधी पक्षांची सत्ता असून भाजपबरोबर जाणाऱ्या पक्षांबरोबर जनता नाही. देशभर भाजपविरोधी वातावरण असून आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी त्यांच्याकडून केंद्रातील सत्ता खेचून घेईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘फोर्ट’ येथील प्रदेश कार्यालयासमोर मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, राखी जाधव, मिलिंद कांबळे, हरीश सणस, नसीम सिद्दिकी, रमेश दुबे आदी उपस्थित होते. राखी जाधव यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच विकास लावंड यांची संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा >>> “आपले अध्यक्ष कधीच तुरुंगात गेलेले नाही आणि त्यांचे…”; मुंबईत शरद पवारांची टोलेबाजी

पवार म्हणाले, दक्षिण भारतातील एकाही राज्यात भाजपची सत्ता नाही. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, झारखंड या उत्तरेतील राज्यात बिगरभाजप पक्षांची सरकारे आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान इथेही भाजपचे सरकार नाही. गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजपने पक्ष फोडून सत्ता बळकावलेली आहे. भाजप दिवसेंदिवस कमकुवत होत असून लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे चित्र बदलेल.

दिल्ली सरकारचे अनेक मंत्री तसेच ‘आप’च्या आमदारांना केंद्र सरकारने तुरुंगात डांबले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी तीन वेळा छापे टाकले. मात्र, त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे सरकार सादर करू शकले नाही. दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे टाकण्यात आले असून केंद्रातील मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर चालविला आहे, असा आरोप पवार यांनी केला. 

एकेकाळच्या सहकाऱ्यांनी आपल्याला संघर्ष करण्यास भाग पाडले आहे. दिल्लीत निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आपली लढाई सुरू आहे. खरी राष्ट्रवादी कोणती हे जनतेला ठाऊक असून निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘कायदा सुव्यवस्थेचे काय?’

राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या  निर्णयावर शरद पवार यांनी टीका केली. पोलीस भरती कंत्राटी करणार असाल तर कायदा सुव्यवस्था कशी राहणार, असा सवाल त्यांनी केला. २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास वाडीवस्तीवरच्या गरजू मुलांनी शिकायचे कुठे, असा सवाल पवार यांनी राज्य सरकारला केला.  जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईत कोणत्याही निवडणुकांना पक्ष सज्ज आहे, असे राखी जाधव यांनी नमूद केले.