राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर सोमवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले.
पवार यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे राष्ट्रवादीचे नेते मदन बाफना यांनी सांगितले. प्रख्यात डॉक्टर सुलतान प्रधान यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीही डॉ. प्रधान यांनीच पवार यांच्या तोंडावर शस्त्रक्रिया केली होती. पवार यांना भेटण्यास कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. पवार यांचा बुधवारी वाढदिवस असला तरी ते कोणालाही भेटणार नाहीत, असे पक्षाने स्पष्ट केले.      

Story img Loader