राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीवरून बंडखोर अजित पवार गटाला टोले लगावले. यावेळी शरद पवारांनी काही जुन्या सहकाऱ्यांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं आणि दोन ठिकाणी खटले दाखल केले आहेत, असंही म्हटलं. ते रविवारी (१५ ऑक्टोबर) पक्षाच्या मुंबई अध्यक्ष निवडीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.

शरद पवार म्हणाले, मी दोन तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलं की, कधी काळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्विकारला आहे. त्यांनीही त्यांच्या अध्यक्षाची निवड केली आहे. फरक एवढाच आहे की, तुम्ही ज्यांची निवड केली ते कधीच तुरुंगात गेलेले नव्हते. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले होते हे मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तो सर्व इतिहास माहिती आहे.

Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”

“आपल्यावर दोन ठिकाणी खटले दाखल आहेत”

“आजची पक्षाची ही बैठक नवा रस्ता दाखवणारी, आत्मविश्वास देणारी आहे. याचा मला आनंद आहे. सध्या इथं आपण जयंत पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं काम करतो आहे. मात्र, काही मित्रांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं आहे. आपल्यावर दोन ठिकाणी खटले दाखल आहेत. एक खटला निवडणूक आयोगात आहे. तेथे सांगण्यात येतंय की, हा पक्ष त्यांचाच आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं.

“खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला”

शरद पवार पुढे म्हणाले, “दुसरा खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. या दोन्ही ठिकाणी तुमच्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला. मला खात्री आहे की, आज ना उद्या निकाल लागेल त्यावेळी सामान्य माणसाच्या अंतःकरणात बसलेली खरी राष्ट्रवादी कोण याचा निकाल आपल्या बाजूने होईल आणि चित्र बदलेल.”

हेही वाचा : “अध्यक्षांना आता आयसीयूत जाण्याची वेळ आली”; संजय राऊतांच्या टीकेवर राहुल नार्वेकर म्हणाले…

“आपल्या खटल्यात निष्णात वकील काम करत आहेत”

“आपल्या पक्षाच्या वतीने ही कोर्ट कचेरी चालू आहे. त्यात निष्णात वकील काम करत आहेत. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे या सर्व कोर्टाच्या कामात माहिती घेण्यासाठी उपस्थित असतात. तसेच वकिलांना लागणारी मदत देत असतो. यामुळे दिवसेंदिवस आपलं म्हणणं सत्यावर आधारित आहे हे लोकांसमोर येईल, याची मला खात्री आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Story img Loader