मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही, काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्यासह १२ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनी केलेला दावा चुकीचा आहे, असा आक्षेप शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बंडानंतर अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. पक्षाच्या बैठकीत आपली अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीवर दावा करीत घडय़ाळ चिन्ह मिळावे म्हणून अर्ज केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावून त्यात अजित पवार यांच्या दाव्यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले होते.

हेही वाचा >>>दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरण : रश्मी शुक्ला यांच्यावरील दोन गुन्हे रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय

आक्षेप काय?

’काही निवडक आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात फूट पडली असे म्हणता येत नाही.

’अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाहीत, कारण त्यांच्यासह १२ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

’अजित पवार यांनी कधी आणि कोणत्या अधिकारानुसार बैठक बोलाविली?