मुंबई : पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून पक्षातून मागणी करण्यात येत असली तरी शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. नव अध्यक्ष निवडण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या समितीची येत्या शुक्रवारी बैठक होणार असून, तेव्हाच नव्या अध्यक्षाचे नाव बहुधा निश्चित केले जाईल. अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केल्यावर अन्य नेत्यांनी त्याला पाठिंबा दर्शविल्याने सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पवार यांनी माघार घ्यावी या मागणीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आक्रमक पवित्रा घेताच निर्णयावर दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले होते.
आंदोलनकर्त्यां कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी बुधवारी संवाद साधला. या वेळी राजीनामा मागे घेण्याबाबत पवार यांनी चकार शब्द काढला नाही. उलट राजीनाम्यावर पवार ठाम असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. येत्या शुक्रवारी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक बोलाविण्याची सूचना पवार यांनी केली. राजीनाम्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी आपण कोणाला विश्वासात घेतले नाही, अशी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची तक्रार आहे. मी तशी विचारणा केली असती तर सर्वानीच नकारात्मक उत्तर दिले असते. नकारात्मक उत्तर मिळणार याची पूर्णपणे खात्री असल्याने विचारण्यात काय अर्थ होता, असा सवाल पवार यांनी केला. तसेच आपल्या राजीनाम्याला वेगळे फांदे फुटले असते, असेही पवार म्हणाले. या वेळी १५ ते २० कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचा फेरविचार करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर मी राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच राजीनाम्याची घोषणा करताना विशद केलेल्या भूमिकेचा पवार यांनी पुनरुच्चार केला.
नवा अध्यक्ष निवडण्याकरिता १८ नेत्यांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो सर्वानी मान्य करावा, अशी सूचनाही पवार यांनी केली.
पवारांनी दिवसभर पक्षाच्या विविध नेत्यांशी चर्चा केली. पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असून, सर्वानी विनंती केली तरीही पवार माघार घेणार नाहीत, असे पक्षाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.
पवारांचा उत्तराधिकारी कोण असणार याबाबत वेगवेगळी नावे घेतली जात असतानाच सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे तर राज्याची धुरा अजित पवार यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्याला पक्षाच्या विविध नेत्यांनी पाठिंबा दर्शविला.
अद्याप काहीही निर्णय नाही, मी स्पर्धेत नाही – पटेल
शरद पवार यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर विचार करण्यास तीन दिवसांची मुदत देण्याची सूचना आम्हाला केली होती. यानुसार पवार कोणता निर्णय घेतात याची सर्वाना प्रतीक्षा आहे. पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यावरच नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी समितीची बैठक बोलाविली जाईल, असे पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. अध्यक्षपदाबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सष्ष्ट केले. तसेच अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही,असेही पटेल यांनी सांगितले.