सोनिया गांधी वा पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष हल्ला चढविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ब्लॉगवरील भूमिका काँग्रेसने गांभीर्याने घेतलेली नाही. दुसरीकडे समाजवादी पार्टीने पवार यांना तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
‘मित्र पक्षांबाबत आम्ही प्रसार माध्यमांमध्ये मते मांडीत नाही. योग्य वेळी मित्र पक्षांशी चर्चा केली जाते, असे सांगत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मिम अफझल यांनी पवार यांची टीका फारशी गांभीर्याने घेतलेली नाही हे सूचित केले. खंबीर नेतृत्वाची गरज आहे या पवार यांच्या विधानाचे स्वागत करताना समाजवादी पार्टीचे नेते नरेश अगरवाल यांनी पवार यांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊन काँग्रेस व भाजपला योग्य पर्याय देण्याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन केल़े
दरम्यान, पवार यांच्या फटकाऱ्याचे नागपूरच्या विधिमंडळाच्या परिसरात उमटले. पवार यांनी इशाऱ्यात न बोलता थेट बोलावे, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली, तर पवारांची टीका काँग्रेस नेतृत्वावर नसून आत्मपरिक्षणाचा  सल्ला त्यांनी सर्वानाच दिला आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लागवला. पवार यांना कोणावर टीका करायची नसून झपाटय़ाने काम करून निर्णय घेतले तर लोक आपल्या मागे उभे राहतात हे त्यांनी आपल्या आजवरच्या अनुभवाच्या आधारे सूचित केले आहे, अशी सारवासारव राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनाही केली.

Story img Loader