कुविख्यात गुंड व गुन्हेगारांना तडीपारी व एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करणाऱ्या, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यासह आर्थिक फसवणुकीचे तसेच सायबर आदी गंभीर गुन्ह्य़ांची उकल करून गुन्हेगारांना अटक करणाऱ्या यंदाच्या दुसऱ्या दुर्गा आहेत, सोलापूर गुन्हे शाखेच्या साहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर. १९ स्त्रियांची अवैध वाहतूक धाडसाने रोखणाऱ्या, अपहृत किंवा पळून गेलेल्या ८३५ मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांपर्यंत पोहोचवणाऱ्या, पीडित स्त्रियांसाठी आधार तर गुन्हेगारांसाठी वचक ठरलेल्या शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या कर्तृत्वाविषयी..
स्त्री वा बालकांची अवैध वाहतूक ही समाजातली अत्यंत लाजीरवाणी बाब, मात्र आजही असंख्यांची अशी अवैध वाहतूक बिनदिक्कत होत असते. मात्र जेव्हा सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या साहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्यासारखे पोलीस दलातील अधिकारी त्याच्या विरोधात धडक मोहीम उघडतात. त्यातल्या गुंडांना जेरबंद करतात आणि पीडितांची सुटका करतात तेव्हा मात्र बालक आणि स्त्री सुरक्षेविषयीची आशा जिवंत राहते. अपहृत किंवा पळून गेलेल्या ८३५ मुलांचा शोध असो की अवैध मानवी वाहतुकीतील १९ पीडित स्त्रियांची सुटका, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांची पोलीस खात्यातील उण्यापुऱ्या पाच वर्षांची सेवा म्हणूनच आश्वासक वाटते.
सोलापूर शहरासाठीची गुन्हे शाखेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना गंभीर गुन्ह्य़ांची उकल करणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कुविख्यात गुंड व गुन्हेगारांना तडीपारी व एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करणे, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यासह आर्थिक फसवणुकीचे तसेच सायबर आदी गंभीर गुन्ह्य़ांची उकल करून त्यांचा तपास करण्याचे कार्य साहाय्यक पोलीस आयुक्त
शर्मिष्ठा घारगे-वालावलकर करीत आहेत. याशिवाय एक जबाबदार कार्यक्षम स्त्री पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे दहशतवादविरोधी कक्ष व सायबर कक्षासह स्त्री अत्याचार प्रतिबंधक कक्ष, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कक्ष, स्त्री समस्या निवारण कक्ष आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. म्हणूनच शहरातील स्त्री पोलीस कर्मचाऱ्यांना आज शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ‘आयकॉन’ वाटतात.
संपूर्ण राज्यात स्त्री व बालकांच्या अवैध वाहतुकीच्या गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी चार वर्षांपूर्वी एकूण १२ कक्ष गठीत करण्यात आले आहेत. यात सोलापूर शहरातही एक कक्ष कार्यरत आहे. या कक्षात शर्मिष्ठा घारगे-वालावलकर या प्रभारी अधिकारी आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली आतापर्यंत अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ खाली पाच कारवाया करण्यात आल्या असून त्यात १९ पीडित स्त्रियांची सुटका करताना २९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या १४ जुलै रोजीची घटना आठवते. भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस या गाडीत अल्पवयीन मुलींची अवैध मानवी व्यापार करण्याच्या हेतूने वाहतूक केली जात असल्याची माहिती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोलापूर रेल्वे स्थानकात धाव घेतली आणि कोणार्क एक्स्प्रेसमधून नऊ परप्रांतीय अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेला दलाल निसटला. ताब्यात घेतलेल्या त्या अल्पवयीन मुली गरीब व निरक्षर कुटुंबातील होत्या. त्यांच्या गरिबी व निरक्षरतेचा फायदा घेऊन व नोकरीचे आमीष दाखवून देहविक्रय व्यवसाय करण्याच्या हेतूने त्यांना मुंबईला नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित आरोपींविरुद्ध अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून पीडित मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच शहरातील रेल्वे लाइन्स भागात एका नगरसेवकाच्या मदतीने चालू असणाऱ्या कुंटणखान्यावर धाड टाकून काही पीडित मुलींची सुटका करण्यात आली. त्याच वेळी संबंधित नगरसेवकासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. संबंधित नगरसेवकाने पलायन करून राजकीय दबावतंत्राचा प्रयोग करून पाहिला. परंतु तो यशस्वी झाला नाही. तो सध्या फरारी असून त्याचे अन्य साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. या कारवाईचे श्रेय अर्थातच शर्मिष्ठा यांना दिले जाते. राजकीय दबावाला न घाबरता त्यांनी ही कामगिरी केली हे कौतुकास्पदच.
मुलींबरोबरच प्रश्न आहे तो घरातून अचानकपणे निघून गेलेल्या किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेण्याचा. त्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम राबविली जाते. सोलापुरात गेल्या वर्ष-सव्वा वर्षांत चार वेळा अशा विशेष मोहिमा घेऊन एकूण ८३५ बालकांचा शोध घेण्यात आला. यात ७७२ मुले तर ६३ मुलींचा समावेश आहे. या सर्व बालकांचा ताबा पालकांकडे देण्यात आला आहे, हे विशेष.
अलीकडे स्त्रियांच्या छेडछाडीचे प्रकार वरचे वर वाढत चालले आहेत. महाविद्यालयीन तरुणी व स्त्रियांना रस्त्यावरून जाताना सडकछाप गुंडांकडून त्रास दिला जातो. त्यावर आळा घालण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पोलिसांची ‘दामिनी’ पथके कार्यरत आहेत. सोलापुरात दामिनी पथकांनी दरारा निर्माण केला आहे. पीडित स्त्रिया तक्रारीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे छेडछाडीचे प्रकारही कमी होत आहेत.
शर्मिष्ठा घारगे-वालावलकर या मूळच्या सांगलीच्या. त्यांचे वडील सांगली महापालिकेत सेवेत होते. तर आई गृहिणी. शर्मिष्ठा लहान असताना आई निरक्षर स्त्रियांसाठी साक्षरवर्ग चालवायची. त्यांच्या आई पुढे नगरसेविकाही झाल्या. घरातील संस्कार, पुस्तक वाचनातून शर्मिष्ठा यांच्या अंगी धाडस आले. शाळेत व महाविद्यालयात शिक्षण घेतानाच कोणी विद्यार्थ्यांने चूक केली तर त्यास जागेवर सुनावयाचे धाडस शर्मिष्ठा दाखवत असत; इतकंच नव्हे तर शेजारच्या घरी किंवा गल्लीत इतरत्र भांडणतंटा होत असेल तर त्यात हस्तक्षेप करून ज्यांची चूक असेल त्यांना खडेबोल सुनावणाऱ्या शर्मिष्ठा यांनी आपल्या अंगभूत गुणांना वाव मिळण्यासाठी पोलीस खात्यात सेवा करण्याचे ध्येय लहानपणीच निश्चित केले होते. त्यास आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. परिणामी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पहिल्याच प्रयत्नातून उत्तीर्ण होऊन शर्मिष्ठा थेट पोलीस उपअधीक्षक बनल्या. पुढे त्यांचा प्रेमविवाह कमलेश वालावलकर या पुरुषसत्ताक संस्कृती विरोधी विचार असलेल्या लेखकाशी झाल्याने त्यांची साथ शर्मिष्ठा यांना खूप मोलाची वाटते.
ऑपरेशन मुस्कान असो वा दामिनीची भरारी पथके साहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर या सोलापूर शहरातील पीडित स्त्रियांसाठी आधार तर गुन्हेगारांसाठी वचक ठरत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम!
- ‘विम’ प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा २०१६’चे सहप्रायोजक आहेत केसरी.
- नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’
- w@gmail.com