शिक्षण, वित्त आणि ग्रामविकास विभागाचे निवृत्त सचिव शशिकांत दैठणकर (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  
गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तातडीने दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.  
१९६२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या दैठणकर यांनी कोल्हापूर, भंडारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला होता. नियमांची आडकाठी न आणता लोकहिताच्या विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमिका घेणारे आणि त्याचप्रमाणे इतरांनाही प्रोत्साहन देणारे दैठणकर सनदी अधिकारी आणि राजकारण्यांमध्येही कमालीचे लोकप्रिय होते. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे सचिव म्हणून काम केलेल्या दैठणकर यांनी राज्याचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालक, वित्त विभागाचे सचिव तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही काम केले होते. शिक्षण सचिव म्हणून केलेले कामही वाखाणण्याजोगे होते.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा