मुंबई : शीना बोरा हत्याकांडाला आणखी एक वळण मिळाले आहे. रायगड येथून पोलिसांनी हस्तगत केलेली शीना हिची हाडे आणि अवशेष सापडत नसल्याची माहिती खुद्द सीबीआयच्या वतीने विशेष न्यायालयात दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे.जे. रुग्णालयातील न्यायवैद्यक तज्ज्ञाची साक्ष नोंदवताना सीबीआयच्या वतीने हा खुलासा करण्यात आला. शीना हिची हाडे आणि अवशेष शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, ती सापडत नसल्याचेही सीबीआयचे वकील सी. जे. नांदोडे यांनी न्यायालयाला सांगितले. शीना हिचा जळालेला मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्या ठिकाणाहून २०१२ मध्ये पेण पोलिसांनी हाडे आणि अवशेष हस्तगत केले होते. त्याची चाचणी या न्यायवैद्यक तज्ज्ञाने केली होती.

हेही वाचा >>>सागरी किनारा मार्गाची एक वाहिन जुलैअखेर सुरू करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

या प्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी ही प्रमुख आरोपी आहे. इंद्राणी हिने दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांच्या साथीने शीना हिची एप्रिल २०१२ मध्ये हत्या केली होती. तसेच, तिच्या मृतदेहाची पेण येथील जंगलात विल्हेवाट लावली होती. त्यानंतर, तीन वर्षांनी २०१५ मध्ये शीना हिचे हत्याकांड उघडकीस आले होते. राय याला एका अन्य प्रकरणात अटक झाल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले. राय हा या प्रकरणी माफीचा साक्षीदार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheena bora case bones and remains seized by police missing information of cbi in special court mumbai print news amy