शीना बोरा हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जी याच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. मुंबई महानगरदंडाधिकाऱयांनी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ केली. पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी संपल्यावर त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआयने पीटरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची विनंती केली व न्यायालायने ११ जानेवारीपर्यंत पीटरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.
१९ ऑक्टोबर रोजी पीटरला सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्याला चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले. पीटरच्या चौकशीतून त्याने इंद्राणीच्या साथीने परदेशात ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे उघड झाले होते. शिवाय इंद्राणीने शीनाच्या नावे हाँगकाँगमध्ये खाते उघडले होते, हेही पुढे आले.
शीना बोरा हत्याप्रकरण: पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
महानगरदंडाधिकाऱयांनी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 28-12-2015 at 14:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheena bora case peter mukerjeas judicial custody extended till january