शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा चालक आणि खटल्यातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याला उच्च न्यायालयाने शनिवारी अखेर जामीन मंजूर केला. सात वर्षांनंतर त्याची सुटका होणार आहे.
इंद्राणी आणि प्रकरणातील सहआरोपी पीटर मुखर्जी या दोघांना अनुक्रमे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे समतेच्या तत्त्वावर आपल्यालाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी राय याने याचिकेद्वारे केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने राय याची ही याचिका योग्य ठरवून त्याला विविध अटींवर जामीन मंजूर केला.
मुंबई : खड्ड्यांच्या प्रकरणाची सुनावणी आता विशेष खंडपीठासमोर
श्यामवर राय हा या प्रकऱणातील माफीचा साक्षीदार असून त्याच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून खटला निकाली निघेपर्यंत त्याची सुटका करता येऊ शकत नाही, असा दावा करून सीबीआयाने त्याच्या जामिनीला विरोध केला होता.
शस्त्र बाळगल्याप्रकरणी राय याला २०१५ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत शीना बोरा हत्याकांडाचा आणि ते शीनाची आई इंद्राणी हिने पहिला पती संजीव खन्ना व राय याच्या साथीने घडवल्याचे उघड झाले होते. त्यानंतर सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली होती.