लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिच्यावर आधारित ओटीटीवर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीपटाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी विशेष न्यायालयात केला. हा माहितीपट २३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सीबीआयने केलेल्या या अर्जाची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. नाईक-निंबाळकर यांनी दखल घेतली. तसेच, नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडियासह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

आणखी वाचा-न्हावा शेवा बंदरातून ११ कोटींचे चायनीज फटाके जप्त, ४० फुटांच्या कंटेनरमधून तस्करी

‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ या माहितीपटामध्ये शीना बोरा हत्याकांडातील आरोपीं आणि खटल्याशी संबंधित व्यक्तींना दाखवण्यात आले आहे. परंतु, इंद्राणीवरील खटला न्यायालयाप्रविष्ट असून तो निकाली निघेपर्यंत हा माहितीपट प्रदर्शित करण्यास मज्जाव करण्याची मागणी सीबीआयने केली आहे.

शीना हिची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या करण्यात आली होती. इंद्राणी हिचा वाहनचालक श्यामवर राय याला अटक करण्यात आल्यानंतर चौकशीदरम्यान या हत्याकांडाचा साल २०१५ मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक राय यांच्या साथीने शीनाची हत्या केली होती आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती, असा इंद्राणी हिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी इंद्राणीसह राय, खन्ना आणि इंद्राणी हिचा तिसरा पती पीटर मुखर्जीही आरोपी असून सगळे जामिनावर बाहेर आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheena bora murder case cbi applies to special court to stay documentary on indrani mukherjee mumbai print news mrj