शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी सलग तिसऱया दिवशी पीटर मुखर्जी यांची चौकशी केली. पीटर मुखर्जी यांना शुक्रवारीही चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याआधी बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवशी पीटर मुखर्जी यांची सुमारे १२ तास चौकशी करण्यात आली होती. या हत्येतील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हित्या दुसऱया पतीची मुलगी विधी आणि शीना बोरा हिचे वडील सिद्धार्थ दास यांना सुद्धा शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी व तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारीही पीटर मुखर्जीची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली. इंद्राणी, संजीव व पीटर यांना समोरासमोर बसवून गुरुवारी अनेक प्रश्न विचारण्यात आले. इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास यालाही गुरुवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले. सायंकाळी त्याला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर इंद्राणीचे तीनही पती प्रथमच समोरासमोर आले.

Story img Loader