शीना वोरा या महिलेच्या खुनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इंद्राणी मुखर्जी यांनी शीना वोरा ही आपली बहिण नसून मुलगी होती, असा खुलासा चौकशी दरम्यान केला. शीना ही पहिल्या पतीपासून झालेली मुलगी असल्याचा कबुली जबाब इंद्राणी यांनी दिल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. इंद्राणी यांच्या या धक्कादायक कबुलीनंतर या प्रकरणासंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यामुळे या प्रकरणाची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे. शीना वोरा हिचे एका भाड्याच्या मारेकऱयाकडून वांद्रे येथील नॅशनल कॉलेज परिसरातून अपहरण करून गाडीतच तिचा खून करण्यात आला. त्यानंतर रायगड येथील जंगलात तिचा मृतदेह टाकण्यात आला, अशी सुत्रांची माहिती असून शीनाच्या हत्येची सुपारी घेतलेल्या मारेकऱयाचा शोध पोलीस घेत असल्याचे कळते.  दरम्यान, शीना वोरा यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांच्या पथकाने पाहणी देखील केली आहे. याशिवाय, इंद्राणीयांच्यासह अटक करण्यात आलेल्या त्यांच्या चाकलानेही महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे.
शीना आणि इंद्राणीच्या नात्याबद्दल मला माहिती नव्हते- पीटर मुखर्जी
प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी गुवाहटी, कोलकाता आणि पेण येथे तीन पथके देखील रवाना करण्यात आली आहेत. तसेच पोलीसांनी इंद्राणी यांचे पहिले पती संजीव खन्ना यांना कोलकात्यातून ताब्यात घेतले आहे. तर गुवाहटीला रवाना झालेले पथक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून दोघांमधील नातेसंबंधाची चौकशी करणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा