पालिका सभागृहात बांगडय़ांचा आहेर देणाऱ्या काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत महापौर सुनील प्रभू यांनी दिले. मात्र काँग्रेस नगरसेविकेवर हल्ला चढविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविकांवर काय कारवाई करणार याबाबत मात्र महापौरांनी मौन बाळगले.
स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या रेसकोर्सबाबतच्या ठरावाच्या सूचनेवर चर्चेस नकार दिल्याबद्दल काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांनी सुनील प्रभू यांना बांगडय़ांचा आहेर दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांनी शीतल म्हात्रे यांना मारहाण केली. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून मंगळवारच्या घटनेचा निषेध केला.

Story img Loader