पी. एन. पी. मेरीटाइम सर्वसेिस लिमिटेड कंपनीने धरमतर खाडीमध्ये बांधलेल्या अनधिकृत दोन जेटय़ा अधिकृत करण्यासाठी, तसेच स्टेट बँकेकडून धरतमतर इन्फ्रास्ट्क्चर प्रा.लि. या कंपनीस ५६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी बंदर अधिकाऱ्याच्या सही व शिक्क्याची बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आमदार जयंत पाटील व त्यांचे पुत्र नृपाल जयंत पाटील यांच्याविरुद्ध आहे.
या प्रकरणी रायगडच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात स्थानिक शेतकऱ्यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १५६(३) व २०४अन्वये तक्रार दाखल केली. याची सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. दरम्यान न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत तथ्य नसून कंपनीने कुठलेही गरकृत्य केलेल नाही असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
आ. जयंत पाटील यांच्याविरोधात तक्रार
पी. एन. पी. मेरीटाइम सर्वसेिस लिमिटेड कंपनीने धरमतर खाडीमध्ये बांधलेल्या अनधिकृत दोन जेटय़ा अधिकृत करण्यासाठी, तसेच स्टेट बँकेकडून धरतमतर इन्फ्रास्ट्क्चर प्रा.लि. या कंपनीस ५६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
First published on: 09-05-2015 at 04:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shekap la jayant patil booked for cheating